“ प्राथमिक शिक्षकांच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबध्द असणारी एकमेव बँक “
प्राथमिक शिक्षकांच्या आशा आकांक्षा पुर्ण करूण आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या हेतूने बँकेची सन १९२४ साली मसूर ता.कराड.जि.सातारा येथे स्थापणा झाली. सातारा जिल्ह्याची विभागणी झालेनंतर दि. ०४/११/१९५२ रोजी आपली बँक दक्षिण सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक होऊन स्वतंत्र कारभार पाहू लागली. सांगली जिल्ह्याच्या निर्मितीनंतर सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक म्हणून नावारूपास आली. आज महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षक बँकात अग्रेसर म्हणून सेवा देत असलेली आमची बँक आहे. तसेच महाराष्ट्रातील पगारदार बँकांत सर्वोत्कृष्ट बँक म्हणून प्रथम पुरस्कार प्राप्त बँक आहे.
आमच्या बँकेने बँकिंगमधील सहकाराचे तत्व अवलंबुन प्राथमिक शिक्षकांबरोबरच सर्वसाधारण लोकांपर्यंत बँकिंग राबविण्याचे उद्दीष्ट ठेवलेले आहे. ते आम्ही मोठ्या प्रमाणात पूर्ण सुद्धा केलेले आहे. सध्या नवीन तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा आणि उत्कृष्ट ग्राहक सेवेचा वापर करून आमची बँक महाराष्ट्रातील एक मोठी बँक म्हणून विकसित होत आहे.
जिल्हा सांगली बरोबरच सोलापूर, सातारा व रत्नागिरी या चार जिल्ह्यामध्ये बँकेच्या कार्यक्षेत्रामध्ये वाढ झालेली आहे. जिल्हा परिषद , नगरपालिका व महानगर पालिका कडील प्राथमिक शिक्षकापैकी बँकेचे ७,००६ सभासद (दि.३१ मार्च,२०२४ अखेर) आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये तालुकावार शाखा आटपाडी, कवठे महांकाळ, जत, शिराळा,तासगांव, इस्लामपूर, मिरज, विटा,पलूस, कडेगांव व सांगली तसेच ग्रामिण भागात आष्टा, आरग, भिलवडी, सावळज, संख व उमदी व सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर येथेही शाखा आहेत.
1) सेव्हिंग्ज ठेव
ही योजना व्यक्तींना पैशाची बचत करण्याची सवय लावण्यास आणि त्यांच्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करण्यासाठी तयार केली गेली आहे.
2) रिकरिंग ठेव
रिकरिंग ठेव ही एक विशिष्ट प्रकारची बचत ठेव योजना असून या योजनेमध्ये प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम जमा केली जाते. यामध्ये १०० रुपयापासून ते काही लाखापर्यंत रक्कम स्वीकारली जाते. दीर्घ मुदतीमध्ये या योजनेअंतर्गत चांगला परतावा मिळू शकतो.
1) मासिक ठेव योजना :
मासिक व्याज ठेव योजनेअंतर्गत ठेवीदारांचे नेहमीच्या उत्पन्नाखेरीज जास्तीचे उत्पन्न असावे तसे मासिक उत्पन्न मिळण्याची सोय होत असल्याने मासिक बजेटचे नियोजन करणे शक्य होते. या योजनेद्वारे ठेवीदांना त्यांच्या सेव्हिंग्ज ठेव खाती ठेवी च्या रकमेनुसार ठराविक व्याज जमा करूण दिली जाते.
स्पेशल कर्ज:
सभासदांना या प्रकारचे कर्ज त्वरीत मंजुरीने अदा केले जाते. सदरचे कर्ज पगारतारणी असून जामिनदारांची आवश्यकता नाही.
घरबांधणी कर्ज :
सभासदांना आपल्या स्वत: च्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी बँकेमार्फत घरबांधणी कर्ज अत्यल्प व्याजदरात उपलब्ध आहे.
वाहन कर्ज :
सभासदांना दु-चाकी किंवा चार चाकी वाहण खरेदी करण्यासाठी या योजनेचा फायदा सभासदांना घेता येईल.
1) मिस कॉल अलर्ट :
मिस कॉल अलर्ट द्वारे ग्राहकांना त्यांचे खातेवरील शिल्लक तपासणीसाठी मदत होणार आहे. काही क्षणामध्ये खातेवरील बाकी चा मेसेज त्यांचे मोबाईल वर मिळेल.
2) एटीएम सुविधा :
ग्राहकांना रूपे डेबीट कार्ड मोफत दिले जाते. रूपे डेबीट कार्ड च्या सहाय्याने ए.टी.एम.मधून पैसे काढणे, ट्रान्सफर, ई-कॉमर्स इ. सुविधेचा लाभ मिळू शकतो.
3) लॉकर सुविधा :
आपल्या मौल्यवान वस्तूची काळजी आणि सुरक्षिततेसाठी बँकेद्वारे सेफ डिपॉझिट लॉकर सुविधा मोफत उपलब्ध करुन दिलेली आहे. डिपॉझिट रक्कम लॉकरच्या आकारावर अवलंबून असते. लॉकरसाठी वारस नोंदीची सोय बँकेमार्फत उपलब्ध आहे..
Check out this great video
CERSAI
CKYC BANNER
Copyright © 2024 Sangli District Primary Teachers Cooparative Bank Ltd; Sangli. - All Rights Reserved.
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.